थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी लोणी-काळभोर येथे महावितरण कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब लक्ष्मण सायकर यांची नियुक्ती करण्यात आली नुकतीच नांदेड येथे केंद्रीय कार्यकारिणीची बैठक संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोदिन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी भाऊसाहेब भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब सायकर हे महावितरण मधील मुळशी विज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष देखील असून सध्या संचालक म्हणून काम पाहत आहेत.
कामगारांचे प्रश्न ,अडीअडचणी तसेच संघटना वाढीसाठी केलेले प्रयत्न ह्यामुळे केंद्रीय कार्यकारणीने पुनच्छ माझी ह्या पदावर निवड केली असून संघटनेने दाखवेलला विश्वास सार्थ ठरवून संघटना वाढ तसेच कामगारांचे प्रश्न ,अडीअडचणी सोडवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न माझ्याकडून केला जाईल असे सायबर यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.
