मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] गेल्या आठ दिवसाहून अधिक राज्यातील अंगणवाडी सेविकांचे वेगवेगळ्या प्रकारे अंदोलन चालू होते जिल्हास्तरावर अंदोलनानंतर शेवटी या अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरु केल्यावर सरकार सकारात्मक प्रतिसाद देत दीड हजार रुपयांची वाढ देण्यास तयार झाले.मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला होता. राज्य सरकारने साडेपाच तर केंद्रानं गेली साडेचार वर्षे मानधनात कसलीच वाढ केलेली नाही.

अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा करून दीड हजार रुपये मानधन वाढवून देण्यास तयार झाले. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली. सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यात चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्र्याच्या आदेशाने ही बैठक झाली. या बैठकीत आज तोडगा काढण्याबाबत प्रयत्न केल्यानंतर. यास यश आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *