पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] लोणीकंद पोलिसांकडे खुनाच्या आरोपातील गेली दोन वर्षापासून फरारी असलेल्या अट्टल गुन्हेगारास लोणीकंद पोलिसांनी राजगुरुनगर तालुक्यातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये सन 2020 मध्ये एक कोणाची तक्रार दाखल झाली होती परंतु त्यातील गुन्हेगार सचिन बाळू वारघडे स्वतःची ओळख लपवून गेली दोन वर्षापासून पोलिसांना मिळत नव्हता यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या खुनाची उकल करण्याच्या सूचना केल्या त्यानुसार सायबर गुन्हे विभागाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे तसेच पोलीस हवालदार पिलाने यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की या कुणाच्या आरोपातील गुन्हेगार राजगुरुनगर तालुक्यातील बहुल गावात असून त्याने अंगात घातलेल्या पोशाखाची संपूर्ण माहिती दिली यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना याची माहिती देऊन त्यांनी केलेल्या सूचनेनुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक गोरे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे,समीर पिलाने यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे बहुल येथे जाऊन सांगितलेल्या वर्णनानुसार ही समास मोठ्या शितापीने ताब्यात घेतले आणि त्याला त्याची ओळख विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन बाळू वारघडे असे सांगितले त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.

ही कारवाई लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे विभागाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस अमलदार समीर पिलाने, सचिन चव्हाण, सागर पाटील, मल्हारी सपुरे महिला किर्ती नरवडे,कोमल भोसले,वृदांवणी चव्हाण यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *