पुणे [हवेलीनामा स्पेशल पुजारी सर] प्लास्टिकचा पर्यावरणास मोठा धोका असल्याने शासकीय पातळीवर प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली असली तरीही याची प्रशासकीय अंमलबजावणी होत नसल्याने आजची परिस्थिती अतिशय भयंकर बनली असून याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे भविष्यातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आजच योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यातील पिढी आपणास माफ करणार नाही परंतु याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न सध्या अधोरेखित होत आहे
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडा बाजार यामध्ये सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो प्रत्येक विक्रेत्याकडे 200 ते 500 प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात बाजारात येणारा ग्राहक कुठलीही भाजी अथवा वस्तू खरेदी केल्यानंतर प्लास्टिक पिशवीची मागणी करतो आणि ही पिशवी त्या विक्रेत्याकडे उपलब्ध असतेच या बाजारात बाहेर पडलेली ही प्लास्टिकची पिशवी दुसऱ्या दिवशी घंटागाडी मध्ये कचऱ्यात आढळून येते त्यामुळे ज्या ठिकाणी कचरा गोळा केला जातो तिथे अक्षरशः प्लास्टिक आणि केवळ प्लास्टिकच सर्व बाजूंना दिसून येते प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने हा पर्यावरणाला फार मोठा धोका आहे याची सर्वसामान्य ना जाण नसल्याचे दिसते जी गृहिणी बाजारात येते प्रत्येक वस्तूसाठी प्लास्टिक पिशवीची मागणी करते म्हणून ग्रामपंचायत पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणारे ग्रामविकास अधिकारी अथवा ग्रामसेवक यांनी यावर कडक प्रतिबंध लावण्यासाठी या प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे ज्या दुकानदारांकडे प्लास्टिक पिशव्या आढळतील त्यांना शासकीय नियमाप्रमाणे दंड आकारून सुरुवातीला टाकीत देऊन पुन्हा त्याचा उपयोग होणार नाही याची खबरदारी घ्यावी यावरही हे नियंत्रणात नाही आल्यास पुढील दंडात्मक कारवाई करावी अन्यथा ही प्लास्टिक बंदी केवळ कागदोपत्रीच राहणार
खरे तर पर्यावरण रक्षणासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व ग्रामपंचायत कार्यालय तशा विशेष सूचना देऊन यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे परंतु आज पर्यंत तसे झालेले नाही.
प्लास्टिक पिशवी वापर करणार्यांवर परिसरात किती कारवाई करण्यात आली याबाबत उरुळीकांचन कुंजीरवाडी थेऊर गावातील ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे विचारणा केली परंतु त्यांच्याकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने यावर प्रशासकीय पातळीवर कसलीही कठोर उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येते.
