पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात सामुहिक काॅपीचा प्रकार उघडकीस आला असून भरारी पथकातील किसन भुजबळ यांनी यास जबाबदार असलेल्या केंद्र संचालक आणि उपसंचालकासह नऊ जणांविरुद्ध यवत पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

येथील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपीत शिक्षकही सहभागी असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नऊ शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा सन 1982 (महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इत निर्दिष्ट परिक्षा) कायदा कलम 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात घडला आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की,27 फेब्रुवारी रोजी बारावीची परीक्षा सुरु असताना भरारी पथकाने अचानक शाळेला भेट देऊन तपासणी केली.

त्यावेळी वर्गात काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळले.यावेळी प्रकाराला शाळेत उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्षरित्या जबाबदार असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे भरारी पथकातील शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

किसन भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन यवत पोलिसांनी जालिंदर नारायण काटे (परीक्षा केंद्र संचालक), रावसाहेब शामराव भामरे (उपकेंद्र संचालक), जयश्री गवळी, सुरेखा होन, कविता काशीद, प्रकाश कुचेकर,अभय सोननवर, विकास दिवेकर, शाम गोरगल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *