पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] शिक्षणाचा हक्क कायद्या अंतर्गत खाजगी शाळामधील 25 आरक्षित जागेवर आधार कार्ड नसले तरीही वडिलांच्या आधारकार्डवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

यामुळे आटीई प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यामध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधार कार्डसंदर्भात मंत्रालयीन शिक्षण विभागाकडे मार्गदर्शक सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अवर सचिव गायकवाड यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना आधार क्रमांक नाही म्हणून लाभापासून वंचित ठेवू नये, असे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करावे. परंतु, काही कारणांमुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत किंवा आधार कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती सादर करू शकले नाहीत, तर अशा प्रकरणांमध्ये बालकांचे व पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच आधार कार्ड तीन महिन्यांत सादर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *