पुणे [हवेलीनामा वृत्तसमूह] प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे अस एका कविने रास्तच लिहिल आहे प्रेमाला ना वय आडव येत ना जातपात,अशीच कहाणी आहे बाबूराव आणि अनुसया यांची. बाबूराव हे शिरोळ येथील असून संसाराच्या मार्गावर पत्नी साथ सोडून गेल्यानंतर त्यांनी वृद्धाश्रमाचा आश्रय घेतला.तर अनुसया या पुण्यातील त्यांना त्यांच्या पतीने देखील यह लोकीचा प्रवास लवकरच अटोपला. त्यानंतर त्याही एकाकी राहिल्याने त्यांनीही वृद्धाक्षमाचा मार्ग स्विकारला. वृध्दाश्रमात राहत असताना दोघांचीही मनं जुळून आली. पण,आपल्या प्रेमाचे प्रपोजल मांडण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी मनाचा धीटपणा करत दोघांनीही विचार करून निर्णय घेतला.

ज्येष्ठ नागरिक म्हणून जीवन जगत असताना अशी काही वेळ येईल, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. पण,यानंतर त्यांच्या आनंदात भर पडली आहे. आनंदी जीवन जगण्याचा मंत्र त्यांनी शोधून काढला.शिरोळ येथील जानकी वृद्धाश्रमात दोन समदुःखी वृध्द वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करून धुमधडाक्यात लग्न लावूनही दिले. त्यामुळे या वेगळ्या लग्नाची चर्चा तर होणारच. अनुसया शिंदे वय 70 मूळ रा.वाघोली,जि.पुणे अशी वृध्द नववधू तर वराचे बाबूराव पाटील वय 75, रा. शिवनाकवाडी, ता.शिरोळ नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात आहेत. त्यामुळे या वृध्द जोडप्यांचे लग्न खूपच चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *