पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नेतवड येथे अपघात झाला यात एकाचा मृत्यू झाला हा तरुण मोटार सायकलवरून जात असताना कठडे नसलेल्या विहिरीत मोटारसायकलसह विहीरीत पडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरी व्यक्ती पाईपाला धरून विहिरीत कडेला थांबला त्यामुळे त्यास जीवदान मिळाले.
घटनेची माहिती मिळताच जुन्नर सुटका पथकातील जवान राजकुमार चव्हाण, रूपेश जगताप, संकेत कबाडी, मगदुम सय्यद, आदित्य आचार्य, कपिल कबाडी, तनिष गायकवाड, आतीफ सय्यद, अली नासेर यांनी दुचाकी व मृतदेह बाहेर काढले.
