नांदेड [हवेलीनामा वृत्तसमुह] थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण करत अभियंत्याचे दोन दात पडले आणि नाकाला चावा घेतला. नांदेडमधील वीज महावितरणचे सहाय्यक अभियंता श्रीकांत सोनटक्के वीज बिल वसुलीसाठी स्नेह नगर पोलीस वसाहतीत गेले होते. एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्याच्या मीटरमधून अनधिकृतपणे वीज जोडून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची पोलीस कर्मचाऱ्याकडे विचारना करण्यासाठी सोनटक्के गेले असता पोलीस कर्मचारी निवृत्ती केंद्रे याने सोनटक्के यांना नाकावर ठोसा मारला. यात सोनटक्के यांचे दोन दात पडले. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गात चांगलाच गोंधळ झाला.

यापुढे विचारना करताना थोड जपूनच वागण.योग्य कारण कोणता ग्राहक कोणत्या परिस्थितीत असेल याची शाश्वती नाही.पोलीस कर्मचाऱ्याने सोनटक्के यांच्या नाकावरही चावा घेतला. सोनटक्के यांच्यासोबत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने मध्यस्थी करून सोनटक्के यांची सुटका केली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी निवृत्ती केंद्रेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याचा कौटुंबीक वाद सुरू असून ते मानसिक तणावात असल्याचे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *