पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण परीसरात स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार पलटी होऊन हा अपघात झाला आहे.चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. या अपघाताची भीषणता इतकी होती कार पलटी होऊन कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे भिगवण हदरले असून एक व्यक्ती जखमी झाला. संदीप राजाभाऊ माळी वय 35, बालाजी केरबा तिडके वय 48 आणि सरस्वती राजाभाऊ माळी वय 61 वर्ष असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत, हे तिघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या दरम्यान पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर – पुणे या लेनवर इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 1 गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानं पुण्याच्या दिशेने येणारी ही कार वाहन क्रमांक एम.एच.43 बी.एन.1402 भिगवण बस स्थानकापासून जवळच उतारावर पलटी झाली या अपघातामध्ये तिंघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे, जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चंद्रकांत रामकिशन गवळी वय 54 वर्ष रा. ज्योती नगर लातूर असं जखमी व्यक्तीचं नाव आहे.
