थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्यावतीने श्रीक्षेत्र थेऊर येथे प्रवाशी वाहतुकीसाठी पुरविण्यात येणारी सेवा विस्तारित करुन वाघोलीपर्यंत केल्यानंतर थेऊर येथून शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी,कामगार, प्रवाशी यांची सकाळच्या तसेच सायंकाळी वर्दळीच्या काळात बस उपलब्ध होत नसल्याने खुप अडचण होत असल्याने याची वाहतूक व्यवस्थापकीय मंडळासोबत हवेलीनामाने चर्चा करून बस उपलब्ध करण्याची मागणी केली.यावर शेवाळेवाडी आगार प्रमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बसमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.

हडपसर थेऊर दरम्यान तीन बस प्रवाशी वाहतूक करतात गेल्या काही दिवसांपूर्वी या मार्गाचा विस्तार केला परंतु बसमध्ये वाढ केली नाही परिणामी दोन बसमधील अंतर तब्बल 50 मिनिटाचे वाढले.यामुळे शालेय विद्यार्थ्यांबरोबरच कामगारांचा खोळंबा झाला.याचा फायदा अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांना झाला.हाच विषय शेवाळेवाडी आगार व्यवस्थापक तसेच व्यवस्थापकीय संचालक यांना संपर्क करुन मांडल्याने यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्दळीच्या काळात बस उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *