पुणे( हवेलीनामा वृत्तसमूह) पुण्याची ओळख ही शिक्षणांचे माहेर घर म्हणून जगात पुण्याचा नावलौकिक आहे पंरतु आज परीक्षा परिषदेच्या आयुक्तांवरच पैसे घेऊन नौकरीला लावतो म्हणून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली त्यामुळे शिक्षणनगरी हदरली चक्क आयुक्तांवरच गुन्हा दाखल झाल्याने भावी शिक्षक माञ अशा घटनेमुळे वारंवार घोटाळ्यात आडकत आहे आघाडी सरकारच्या काळात २०१०ला बंद पडलेली शिक्षक भरती २०२३उजाडले तरी होईना अनेक अटी अनेक परिक्षा देऊन डीएड बीएड वाले मेटाकुटीला आला आहे अनेकांचे तर परिक्षा देऊन निकाल पण आले तरी तब्बल तीन तीन परिक्षा दिल्या पंरतु ही भरती कायम वादात सापडली आहे फक्त घोषणा होतात परिक्षा होतात फी वसूल केली जाते पण प्रत्यक्ष भरती होतच नाही गेल्या तीन वर्षात अनेक मोठमोठे घोटाळे झाले यात घोटाळे करणारे घोटाळे करतात पण यात भरडला जातो तो भावी शिक्षकच अनेकांची भरतीची वाट पाहून वय संपून गेली प्रक्रियेमधून बाहेर देखील पडली पण याच सरकारला सोयरेसूतक नाही महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये शिक्षक पदे रिक्त आहेत विद्यार्थींचे अतोनात नुकसान होतय परंतु याकडे सरकारला लक्ष देयला वेळच नाही अशातच आता ज्या एजन्सीला शासन भरती प्रक्रिया राबविण्याचा ठेका देते त्या एजन्सीवरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. त्यातच आज पुण्यातील घटनेने एकच खळबळ उडाली शिक्षण विभागात शिक्षक पदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तब्बल 45 जणांकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (रा. पाषाण, पुणे), त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले. ता. इंदापूर, पुणे) अशी गुन्हा दाखल कऱण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सांगली जिल्हयातील 50 वर्षीय शिक्षकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार 15 जून 2019 ते आतापर्यंत घडलेला आहे. पोलिसांनी सांगितले, की शैलजा रामचंद्र दराडे ऊर्फ खाडे या परिक्षा परिषदेच्या आयुक्त म्हणून काम करत आहे. त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याने तक्रारदार यांना बहीण शैलजा दराडे या शिक्षण विभागात वरिष्ठ पदावर काम करत असून शिक्षक म्हणून नाेकरीस लावण्याचे काम त्या करुन देऊ शकतात असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांच्या दाेन वहिनींना शिक्षक पदावर नाेकरी लावताे असे सांगत, त्यांच्याकडून प्रत्येकी 12 लाख रुपये आणि 15 लाख रुपये असे एकूण 27 लाख रुपये घेण्यात आले. परंतु, त्यानंतर त्यांना शिक्षक पदावर नोकरीस न लावता, टाळाटाळ करण्यात आली आणि सतत पैशाची मागणी करुनही त्याची परतफेड आराेपींनी केली नाही. अशाचप्रकारे आणखी 44 जणांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक चेतन थोरबोले करत आहे. दरम्यान, याप्रकरणी परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दावा केला आहे की, माझा भाऊ दादासाहेब दराडे हा माझ्या पदाचा गैरवापर करुन लाेकांना शिक्षक पदावर नाेकरीस लावून देताे असे अमिष दाखवून पैसे घेत होता, ही बाब समजल्यावर मी त्याच्याशी वर्षापूर्वीच नाते तोडलेले आहे. त्याच्या साेबत काेणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार काेणी करु नये अशाप्रकारची जाहीर नोटीसही ऑगस्ट 2020 मध्ये देण्यात आलेली होती.पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *