पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे नगर महामार्गावरील वाघोलीत अनैतिक संबंधांचा संशय घेऊन पिता पुत्रांवर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ताब्यात घेतले
गुन्हे शाखेतील युनिट ६ मधील पोलीस अधिकारी तथा अंमलदार हद्दीमध्ये गस्तीवर असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे व नितीन धाडगे यांना एका बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक तरुण हातात धारदार हत्यारासह श्रीदत्त हॉटेल बायफ रोड, वाघोली येथे पिता पुत्रांवर हल्ला करुन गंभीर जखमी केले असुन तो पळून जाण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाल्याने गस्तीवरील पथक रवाना होवून त्या तरुणास स्थानिक रहिवासी हिरामण चौधरी, संजय कांबळे, राहुल अवचिते यांच्या मदतीने ताब्यात घेवून त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता रवींद्र श्रीराम कदम वय 39 वर्ष रा- पवार यांचे खोलीत भाड्याने, बायफ रोड, वाघोली पुणे असे सांगुन पत्नीचे अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे.
ही कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस नाईक रमेश मेमाने, पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे यांच्या पथकाने केली आहे.
