पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ ग्रामपंचायतचे सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात आज दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव 10 विरुद्ध 3 असा मंजूर करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.आज सकाळी अकरा वाजता कोरेगाव मूळ ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांसाठी विशेष सभा आयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास दाखल करताना म्हटले होते की, विद्यमान सरपंच विठ्ठल शितोळे हे कोरेगाव मूळ ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, तसेच बहुमताने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतिचे कामकाज करणे, सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत.

या ठरावावर उपसरपंच वैशाली अमित सावंत, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब यशवंत बोधे, भानुदास खंडेराव जेधे, मंगेश अशोक कानकाटे, सचिन गुलाब निकाळजे, लिलावती बापूसाहेब बोधे, अश्विनी चिंतामणी कड, राधिका संतोष काकडे, मंगल जगन्नाथ पवार, पल्लवी रमेश नाजीरकर, या १० सदस्यांच्या सह्या केल्या होत्या यावर तहसीलदार किरण सुरवसे यांनी आज सकाळी अकरा वाजता कोरेगाव मूळ ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांसाठी विशेष सभा आयोजित केली.

या विशेष सभेसाठी हवेललीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्यासोबत मंडलाधिकारी तलाठी उपस्थित होते.

या अविश्वास ठरावाकडे कोरेगाव मूळसह पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *