पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] अष्टविनायक सुविधा प्रकल्प अंतर्गत तयार करण्यात आलेल्या थेऊरफाटा लोणीकंद महामार्गावर आज दोन अपघात घडले यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत सुदैवाने कोणी दगावले नाही अपघातानंतर ताबडतोब मदत मिळाल्यानंतर गंभीर जखमी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काल सोमवारी थेऊर फाटा थेऊर कोलवडी या मार्गावर दोन अपघात घडले यामध्ये गाढवे मळा कॉर्नर वर एक मार मोटर व पिकअप समोरासमोर धडकून यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. तर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास थेऊर स्मशानभूमी परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस पाठीमागून एक वयस्कर दुचाकीस्वार थडकल्या ने गंभीर जखमी झाला,त्या ट्रॅक्टरचा पाठीमागे कोणताही रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात घडला.त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले या अपघाताची माहिती मिळताच पोलीस नाईक विशाल बनकर, पोलीस मदतनीस राहुल गायकवाड, संतोष ओव्हाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते आजीम मण्यार,दिपक शितोळे,आप्पा घाडगे व अन्य सहकारी घटनास्थळी धावले यांच्यासोबत दोन स्थानिक पत्रकारही घटनास्थळी मदतीसाठी धावले त्यावेळी सुसाट येणाऱ्या वाहनांना मार्ग काढून देत असताना एक सुसाट वेगाने आलेला दुचाकीस्वार मदतीस उभ्या असणाऱ्या घोळक्यात शिरला यामुळे एकच गोंधळ उडाला मदत करणाऱ्या पैकी बरेच जण बाजूच्या खड्ड्यात पडले त्यामुळे त्यांना जखमा झाल्या तर काहीजणांना मुका मार लागल सुदैवाने तेथे एक दुचाकी उभी असल्यामुळे अनर्थ ठरला अन्यथा मदतीला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला पडला असता जखमींना दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच थेऊर चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख व सहकारी घटनास्थळी धावले.

थेऊर स्मशानभूमीपासून मुळा-मुठा नदी वरील पुलापर्यंत रात्रीच्या वेळी अंधार असल्याने वाहन चालकांना कसल्याही अंदाज येत नाही त्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात घडले रात्रीच्या वेळी ही दुचाकी स्वार सुसाट वेगाने आल्याने हा अपघात घडला त्यासाठी या मार्गावर लाईटचे पोल बसवणे अतिशय आवश्यक झाले आहे यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *