पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे शिक्षण विभागातील लेखाधिकारी व कनिष्ठ लेखाधिकारी यांनी एका शिक्षकाच्या सेवा पुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती पडताळणी करून देण्यासाठी सहा हजार रुपयाची मागणी केली यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज सापळा रचून 5000 रुपयाची लाच स्वीकारताना दोघांना ताब्यात घेण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिक्षक यांनी पुणे शिक्षण विभागातील लेखाधिकारी प्रमिला प्रभाकरराव गिरी यांनी सेवा पुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करून देण्यासाठी लोकसेवक प्रमिला गिरी यांनी त्यांच्याकडे सहा हजार रुपयाची मागणी केली त्यानंतर तक्रारदार शिक्षकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची याची तक्रार केल्यानंतर आज गिरी यांच्या वतीने लाच घेण्यासाठी सहाय्य करणाऱ्या अनिल श्रीधर लोंढे कनिष्ठ लेखाधिकारी यांना पाच हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले.
त्यांच्यावर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई लाचलुचपात प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमूल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार या करीत आहेत.
