पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] अन्न व औषध विभागाकडून एका कंपनीत लॅक्टोज विक्री परवाना घेण्यासाठी विभागाकडे अर्ज केला होता यास मंजुरी देण्याकरिता अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी दहा हजाराची लाच मागितली तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास याची तक्रार दिल्यानंतर आज सहाय्यक आयुक्त देसाई यांना दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले त्यांच्यावर चतुःशृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कंपनीने लॅक्टोज विक्रीसाठी परवानगी अर्ज केला होता यास मंजुरी देण्यासाठी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध विभाग चे साहेब एकनाथराव देसाई यांनी दहा हजार रुपयाची मागणी केली यावर तक्रारदार यांनी या विरोधात लाचलुपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार या तक्रारीची पडताळणी करून आज सापळा रचून देसाई यांना दहा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.
