पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) हिंदवी स्वराज्यांचे संस्थापक अखिल हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मारुंजी(ता.मुळशी)येथे मोठ्या उत्साहात दिमाखात साजरी करण्यात आली आयटी नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा जयघोष झाला अवघी आयटीनगरीतील वातावरण शिवमय झाले होते शिवभक्तांचा आंनद ओसांडून वाहत होता चौफेर भगवे वातावरण झाले होते प्रत्येक चौकात भगवा झेंडा लक्ष वेधून घेत होते मारुंजी गावामध्ये सर्व शिवभक्तांनी एकत्र येत एक गाव एक शिवजयंती करण्याचे आयोजन केले होते यामुळे शिवजयंती सोहळा मोठ्या थाटामाटात ढोलताशाच्या तसेच फटाक्याच्या अतिष बाजी करुन साजरा करण्यात आला. शनिवारी रात्री गावातील सर्व कार्यकर्त्यांनी पुण्यातून मशाल घेऊन रविवारी सकाळी मारुंजी मध्ये आगमन झाली सकाळी ९ वाजता शिवतिर्थ चौक ते मारुंजी गाव या ठिकाणी मशाल मिरवणुक पारंपारीक पध्दतीने काढण्यात आली यामध्ये ग्रामस्थ व न्यु इग्लिंश स्कुल मारुंजी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी ५ वाजता गावातील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मनोगत व्यक्त करुन शिवरायांच्या आठवणीना उजाळा दिला तर छत्रपती शिवाजी महारांचे पोवाडे तसेच मर्दानी खेळ, नृत्य सादर केली सायंकाळी ६ वाजता शिवव्याख्याते राकेश पिंजन यांचे शिवव्याख्यान सादर करण्यात आले यानंतर सायंकाळी सात वाजता अलार्ड काॕलेज पासून मिरवणूकीला सुरुवात झाली अतिशय भव्यदिव्य अशी मिरवणूक पारंपरिक पध्दतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवमुर्ती ची गजमुख देखाव्याची आरास करुन भव्य मिरवणुक काढण्यात आली यात मोठ्या संख्येंने अबाल वृध्द लहान मुले तरुण मंडळी युवक युवती मोठ्या संख्येन सहभागी झाले होते जय भवानी जय शिवाजी, तसेच शिव छत्रपतींच्या नावाच्या घोषणानी आयटी नगरी मारुंजी दणाणून निघाली होती ढोल ताशा तसेच लेझिम पथकांच्या खेळावर अनेकांनी ठेका धरला होता मिरवणूकीने प्रदाक्षिणा पूर्ण केल्यावर कार्यक्रमाची सांगता होऊन उपस्थित सर्व शिवभक्तांचे आभार अखिल मारुंजीगाव शिवजयंतीची महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले
