पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह]  पुणे बंगळुरु महामार्गावर सोनल वाईन्स मध्ये दिवसभर जमा झालेली रक्कम घेऊन जात असताना अज्ञात चोरट्याने गोळीबार करून हिसकावून पळून नेली यामध्ये तीन लाख 78 हजार रुपये पळवल्याची माहिती समोर येत असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीवरून पुणे बंगळूर महामार्गावरील खेड शिवापुर परिसरात असलेल्या सोनल वाईन्स मध्ये काल रविवारी दिवसभर जमा झालेली रक्कम तीन लाख 78 हजार रुपये दीपक शंकर जगदाळे आणि कालेश्वर अगारीया रात्री घरी घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात तीघा इसमांनी दुचाकीला धक्का दिला व हातातील पैशाची पिशवी हिसकवण्याचा प्रयत्न केला यास कालेश्वर याने विरोध केल्याने चोरट्याने स्वतः जवळील पिस्तूल काढून दोन फायर केले आणि ती पिशवी हिसकावून तिथून पळून गेले या घटनेची माहिती मिळतात राजगड पोलीस घटनास्थळी धावले आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळास भेट दिली असुन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारी पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *