थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] लोणी-काळभोर येथील श्रीक्षेत्र रामदरा वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या डोंगरावर आग लागल्याचे चित्र जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून दिसत असून ही आग विझविण्यासाठी महाराष्ट्र ग्रीन फाऊंडेशनचे लोणी-काळभोर येथील सदस्य करत आहेत.

लोणी-काळभोर येथील सह्याद्री पर्वतराईत वेगवेगळ्या वन्यजीवासह वृक्षाच्या विविध प्रजाती आहेत तर गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य ग्रीन फाऊंडेशन येथे वृक्ष लागवड तसेच संरक्षण करीत आहेत निसर्गाचे संरक्षण जतन करण्याचे हे काम अविरत चालू आहे परंतु या भागात फिरायला येणारे पर्यटक अनेक वेळा सिगारेट विडी ओढल्यानंतर पेटती सिगारेट तशीच फेकतात त्यामुळे अनेकदा वणवा लागतो.
आज याच डोंगरावर लागलेल्या वणव्याचे चित्र लांबून दिसत होते.वन विभागाकडून हा वणवा विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होणे आवश्यक आहे.यात दुर्मिळ वनसंपदा तसेच वन्यजीव भक्ष्य पडण्याची भिती निर्माण झाली आहे.
