पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पूर्व हवेलीतील थेऊरसह आंळदी म्हातोबा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वत्र शिवाजी महाराजांच्या फोटो असलेले भगवे झेंडे दुचाकी तसेच चारचाकी वाहनाना लावून सगळीकडे भगवे वातावरण .झाले होते गावांमधील बाल शिवभक्तांच्या आंनदाला उधाण आले होते हातात झेंडे घेऊन जय भवानी जय शिवाजी घोषणा देत बालगोपळ फिरताना दिसत होते सर्व जिल्हा परिषद शाळा माध्यमिक विद्यालय येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. थेऊर येेथे मुख्य समारंभ ग्रामपंचायत सभागृहात पार पडला सरपंच शितल काकडे यांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपसरपंच आप्पासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य राहूल कांबळे,गौतमी कांबळे,संजय कुंजीर,शरद काकडे,रुपचंद बोडके,दत्ता तांबे,ग्रामसेवक तुकाराम पाटील,मुुुख्य लिपीक प्रकाश आळंदे उपस्थित होते.आळंदी म्हातोबा येथे ग्रामपंचायत सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले यावेळी ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
