चंद्रपूर [हवेलीनामा वृत्तसमुह] हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील एका भव्य कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यगीत “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” याचे लोकार्पण केले.

जसे देशाचे राष्ट्रगीत असते तसेच आपल्या गौरवशाली महाराष्ट्राचे राज्यगीत असावे हीच आपल्या राज्यातील जनतेची मागणी होती आणि ती आज या “जय जय महारष्ट्र माझा” या गीतातून पूर्ण झाली.या गीतामुळे अंगात वीरश्री शिरते नसानसात एक संचार दाटून येतो,जेव्हा राज्याच्या स्वातंत्र्यावर संकट येत तेंव्हा छत्रपती शिवराय यासाठी स्फुरण देतात.असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
आज श्रीमान योगी छत्रपती शिवाजीमहाराज यांची 393 वी जयंती साजरी करताना आपल्या राज्याच राज्यगीत मिळाले याचा संपूर्ण नागरिकांना अभिमान वाटतो आहे.
