पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] होस्टेल चालक-मालक यांच्यातील वादानंतर होस्टेलच्या प्रवेशद्वाराला प टाकून विद्यार्थ्यांना आत मध्ये कोडल्यामुळे या चालक मालक यांच्यावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये पोलिसांनी विद्याधर व्यंकटराव वाघधारे सत्यभामा विद्याधर वाघधारे केदार किसन चंदनशिव ओंकार किसन चंदनशिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे लोणी काळभोर स्टेशन परिसरामध्ये असलेल्या बिल्डिंग येथील रहिवासी इमारतीतील निवासी गाळे एका खाजगी कंपनीला भाड्याने दिले परंतु यात बिल्डिंग मालकांनी कुठलाही भाडेकरार केलेला नव्हता यांच्यातील भाड्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला व बिल्डिंग मालकाने इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासच कुलूप लावून विद्यार्थ्यांना आत मध्ये डांबले
या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि विद्यार्थ्यांची सुटका केली पोलिसांनी मालक व चालक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तरटे करीत आहेत
