पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या इ – पिक पाहणी ऑनलाईन नोंदणीत बारमाही पिकाच्या नोंदीत यंदा ऊस या नगदी पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे राज्याच्या सर्वच भागात सुमारे एकूण पीक नोंदणी पैकी चार लाख पाच हजार हेक्टरावर उसाची लागवड झाल्याची माहिती समोर येत असून दुसऱ्या क्रमांकावर केळी तर तिसऱ्या क्रमांकावर संत्री पिकाची नोंदणी झाली आहे. नगदी पिकाच्या लागवडी बरोबर हंगामी असलेल्या हरभरा, ज्वारी, गहू, कांदा, मका या पिकांची देखील आकडेवारी या योजनेच्या माध्यमातून समजणे शक्य झाले आहे.

महसूल विभागाकडून गेल्या चार ते पाच वर्षापासून राज्यातील पिकांची नोंदणी घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात आहे ही नोंदणी इ पीक पाहणी या योजनेमध्ये करता येते. शेतकरीच या योजनेमध्ये पिकाची माहिती तसेच शेतात उभ्या असलेल्या पिकाची छायाचित्र अपलोड करू शकतात. जर संबंधित शेतकऱ्यांनी पिकाचे नोंद ही पिक पाहणी उपायोजनेद्वारे न केल्यास ती तलाठी कार्यालयाच्या वतीने करण्यात येते. त्यानुसार सन 2022 – 23 या वर्षासाठी महसूल विभागाने केलेल्या पीक पाहणी नोंदीत आतापर्यंत राज्य सर्वाधिक ऊस या पिकाची नोंदणी झाली असल्याची आकडेवारी समोर येत आहे.

पूर्वी केवळ पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून ऊस हे नगदी पीक घेण्याची स्पर्धा होती परंतु यात अलीकडे विस्तार होऊन ती राज्यभरात पोहोचली त्यानुसार राज्यातील सर्वच विभागात मिळून चार लाख 50 हजार हेक्टरवर ऊस पिकाची नोंदणी झाली असल्याचे दिसून आले विशेष म्हणजे मराठवाडा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आता देखील ऊस या नगदी पिकाचे उत्पादन वाढू लागल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *