पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पूर्व हवेलीतील एका सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून येत्या मंगळवारी यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे 13 पैकी 10 सदस्यांनी ठराव दाखल केला आहे यात ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, तसेच बहुमताने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतिचे कामकाज करणे, सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत.असा ठपका ठेवण्यात आला आहे.
येत्या मंगळवारी या ठरावावर ग्रामपंचायत कार्यालयात सदस्याची विशेष सभा आयोजित केली आहे
यात सरपंचाचे भवितव्य ठरणार आहे याकडे संपूर्ण हवेलीतील नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
