पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेचे अधिवेशन कोकणात होत असल्याने जिल्ह्यातील बहुतेक शाळा बंदच असल्याचे दिसून येत आहे खरे तर शाळेला चार दिवस सुट्टी देणे तसे कुठलेही नियमात बसत नाही परंतु हवेली तालुक्यातील थेऊर सह परिसरातील शाळा बुधवारपासून रविवार पर्यंत बंद असल्याचे दिसून येत आहे
अगोदरच मराठी शाळेतील शिक्षणाचा दर्जा यावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकत आहे अशावेळी मराठी शाळेतील शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी शासकीय पातळीवर होणारी धडपड ही चालू असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान करून चार दिवस सुट्टी देणे कितपत योग्य आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या दोन्हीही संघटनांचे अधिवेशन एकाच वेळेत घेण्यात येत आहे शासनाकडून या दोन्ही संघटनांना एकाचवेळी अधिवेशनाची परवाणगी कशी काय देण्यात आली तसेच या संघटनांकडून नेमक्या परिक्षा जवळ असतानाचाच वेळ कसा मिळतो असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. विद्यार्थ्यांचे कोरोना काळात मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे यातून त्यांना सावरण्या अगोदर पुन्हा अशा चार पाच दिवसाच्या सुट्ट्या दिल्याने अभ्यासातील लिंक तुटते.अधिवेशन घेण्यास कोणाचीच हरकत नाही परंतु त्याचा कालावधी दिवाळीत अथवा उन्हाळी सुट्ट्यामध्ये का नसतो हा देखील मुद्दा अनेकांनी अधोरेखित केला.
थेऊर येथील प्राथमिक शाळेत जवळपास चारशे विद्यार्थी शिक्षण घेतात.त्यासाठी बारा ते तेरा शिक्षक सेवा देतात. अशीच परिस्थिती परिसरातील शाळेची अवस्था आहे.
