रत्नागिरी [हवेलीनामा वृत्तसमुह] आई वडिलानंतर गुरुजींचे स्थान आदराचे आहे. कुंभार जसा मातीला आकार देतो त्याच पद्धतीचे शिक्षक काम करत आहेत. डॉक्टर जीवदान देतो तर शिक्षक खऱ्या अर्थाने जीवनाला आकार देतात. शिक्षकांना वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी त्यांच्या गाडीवर TR लावण्याबाबत विचार सुरु आहे. मी साधा कार्यकर्ता आहे. बोलायचं म्हणून बोलत नाही. मी जे बोलतो ते करुन दाखवतो. राज्यातील सर्व मुलामुलींना समान आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणार आहोत. कितीही अधुनिक तंत्रज्ञान आल, तरीही शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. 30 हजार शिक्षकांची रिक्त पदे आपण भरत आहोत. केंद्र प्रमुख पदे देखील भरणार आहोत. दुर्गम भागातील असल्यामुळे प्रत्येक घटकांची जाण आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत सुरु असलेल्या प्राथमिक शिक्षक 17 व्या अधिवेशनाचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

धाडसी निर्णय घेणार सरकार आज राज्यात सत्तेत आहे. जुनी पेन्शनचा विषयावर गांभीर्याने काम करत आहोत. कुठल्याही विषयाला बगल देण्याचे काम आम्ही करणार नाही. अडीच वर्षातील थांबवलेले निर्णय आम्ही धाडसाने सुरु केले. मी काल कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे. उद्याही कार्यकरताच असेन,

शिक्षक सेवकांना 16 हजार रुपये वेतन देणार आहोत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी केली आहे.

केसरकरांनी सांगितले की, यापुढे खुल्या गटाच्या विद्यार्थ्यांना देखील मोफत गणवेश देण्यात येतील. शिक्षकांवरील भार कमी करण्यात येणार आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामे वगळण्याचा जीआर काढला आहे. आता डॉक्टरांच्या गाडीवर DR असते त्याप्रमाणे शिक्षकांच्या गाड्यांवर TR असे लिहिण्याची परवानगी लवकरच देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी संकेत दिलेत.

शिक्षकांचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील. मुलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाची सफाई यापुढे ग्रामपंचायत करणार आहे. स्वच्छतागृह आणि कुंपनासाठी 590 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षक समितीचे स्थान आमच्या हृदयात आहे, असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *