पुणे [हवेयलीनामा वृत्तसमुह] जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंखेतील विदारक परिस्थिती सध्या समोर येत असून वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम पानशेत खोऱ्यातील आंबेगाव बुद्रुक आणि घिवशी शाळेतील परिस्थिती अतिशय भयंकर असून आंबेगाव बुद्रुक येथील प्राथमिक शाळेत एक तर साडेसहा किलोमीटर अंतरावरील घिवसी येथील शाळेत एक विद्यार्थी पटसंख्या आहे दोन्ही विद्यार्थी एकाच गावचे आहेत मात्र एक विद्यार्थी त्याच्या गावातील शाळेत दुसरा घिवशी येथील शाळेत शिकत असल्याचे चित्र पहावयास मिळाले

एकाच गावातील रहिवाशी असलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी गावातील शाळेत दुसरा विद्यार्थी साडेसहा किलोमीटर असलेल्या शाळेत शिक्षण घेत आहे महत्त्वाची बाब म्हणजे गावातील एका विद्यार्थ्यास स्वतः शिक्षक आपल्या मोटरसायकलीवरून दररोज ने आण करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या भेटीतून स्पष्ट झाले. शाळेतील शिक्षकाची नोकरी प्रत्येदर्शी सुरक्षित आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पानशेत खोऱ्यातील काही शाळांना अचानक भेटी दिल्या त्यामध्ये शाळा सुरू ठेवण्यासाठी शिक्षकांनी केलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

एका बाजूला शिक्षक कमी असल्याची ओरड जिल्ह्यामध्ये सुरू असताना दुसरीकडे मात्र काही शिक्षक कामापासून पळ काढण्यासाठी आणि सोयीस्कर ठिकाणी कायम राहण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करत असल्याचे या दोन गावातील विद्यार्थी संख्येवरून दिसून येत आहे या संदर्भात कारवाई कोणत्या नियमाने शिक्षकात चर्चा सुरू आहे एक विद्यार्थी शाळेत असला तरी दोन शिक्षक असणे आवश्यक आहे याच नियमाचा आधार घेत आंबेगाव बुद्रुक आणि घेऊशी शाळेत प्रत्येकी एक विद्यार्थी आहे दोन्ही विद्यार्थी एकाच गावातील हा मुद्दा घेऊन त्यामुळे कोणत्या नियमानुसार कारवाई करावी असा प्रश्न शिक्षण विभागासमोर उभा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *