पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरायांच्या जन्मभूमीत शिवनेरी गडावर तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात शिवकालीन ग्राम व बाजारासोबतच महाराष्ट्रीय भोजन, शिववंदना, जन्मोत्सव आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.
यातील मुख्य आकर्षण म्हणजे 18 फेब्रुवारीस मराठीबाणा तर 19 व 20 फेब्रुवारीस जाणता राजा हा भव्य नाट्य प्रयोग होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या शिवजन्मोत्सवास हजेरी लावणार आहेत त्यामुळे यावर्षी हा जन्मोत्सव मोठ्या जोमात आणि उत्साहात साजरा होणार आहे.
