राजगुरुनगर (हवेलीनामा वृत्तसमूह) येथील पुणे – नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळ शिरोली येथील खरपुडी फाट्यावर सोमवारी (दि. १३) रात्री पावणे अकरा वाजण्याचा सुमारास भीषण अपघातील मृतांचा आकडा पाचवर पोहोचला आहे. या अपघातात पुण्याच्या बाजूने वेगात आलेल्या अज्ञात (महिंद्रा एक्स. यु. व्ही. ) मोटारीने १७ महिलांच्या जमावाला जोरदार धडक दिली. या भयानक अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या तर उपचारादरम्यान तीन महीलांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अतिशय वेगात दिलेल्या मोटारीच्या धडकेने चार ते पाच महिला हवेत उडून नंतर रस्त्यावर पडुन मोटारीखाली चिरडल्या गेल्या.

सुनंदा सटवा गजेशी, सुशिला वामन देढे (रा.रामटेकडी, शांतीनगर, पुणे ) इंदुबाई कोंडीबा कांबळे (रा.किरकटवाडी, सिंहगडरोड, पुणे ) सायराबाई प्रभु वाघमारे (रामटेकडी, हडपसर, पुणे ) या महिला अपघातात मृत्यूमूखी पडल्या. शोभा राहुल गायकवाड, सारीका देवकर, वैशाली लक्ष्मण धोत्रे, शोभा सुभाष शिंदे यांसह आणखी एक महीला (नाव समजु शकले नाही) या महिला कामगार गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर सात महीला किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघातातील मृत व जखमी महीला या अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात रोजंदारीवर वाढपी काम करण्यासाठी स्वारगेट येथुन पीएमटी बसने शिरोली येथे उतरल्या होत्या. खरपुडी रस्ता येथील एका मंगल कार्यालयात मंगळवारी असलेल्या लग्न कार्यक्रमात स्वयंपाक करून वाढपी काम करण्याचे काम करण्यासाठी जाताना घोळक्याने रस्ता ओलांडताना पुणे बाजुकडुन एक पांढऱ्या रंगाची महींद्रा एक्सयुव्ही किंवा टियुव्ही या मॉडेलची मोटार भरधाव वेगात आली. मोटारीने या सर्वांना जोराची धडक दिली. धडक देऊन मोटार दुभाजकावर आदळली. तरीही चालकाने तशीच मोटार मागे घेऊन बाजूला घेतली आणि युटर्न घेतला.नंतर तशाच भरधाव वेगात पुणे बाजुकडे निघून गेला. रात्री अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात मोठा आरडाओरडा झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला.

दरम्यान, चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी पोलीस व स्थानिक नागरीकांनी दाखल केले. या घटनेबाबत शिवानी कैलास माने ( रा.पर्वती दर्शन, साईबाबा मंदीरासमोर, सातारा रोड, स्वारगेट, पुणे ) यांनी अज्ञात चालकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *