पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] इचलकरंजीत नदी पात्राची स्वच्छता करताना एक पोतं भरुन आधार कार्ड सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दीड महिन्यांमध्ये हजारो रेशन कार्डचा ढीग सापडल्याने आता आधारकार्ड सापडल्याने यामध्ये मोठं रॅकेट आहे का? याची चर्चा सुरु झाली आहे. रविवारी आधार कार्डचा गंभीर प्रकार आढळून आला. आधार कार्डवरील बहुतांश नागरिकांचे वय साधारण 60 ते 65 वयापर्यंत आहे. त्यामुळे पेन्शन मंजुरीच्या हेतूने आधार कार्डवर वय वाढवण्याचे प्रकार तर सुरु नाहीनायाची शंका उपस्थित होत आहे.

पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता करत असताना राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना हे पोतं तरंगताना दिसल्याने बाहेर काढले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नदीत सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सापडलेली सर्व आधार कार्ड इचलकरंजी शहर आणि परिसरातील असल्याचे समजते. इचलकरंजी परिसरात आधार कार्ड आणि रेशन कार्डचा ढीग सापडत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

आधार कार्ड बाहेर काढल्यावर सर्व ओरिजिनल असल्याचे समजते. इचलकरंजी शहरासह जवाहरनगर, कोरोची, कबनूर भागातील हे आधारकार्ड असल्याचे समजते. यावरील मोबाईल नंबरवरून काहींना संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी ती आपलीच असल्याचे सांगितले. आधार कार्ड तयार करणार्‍यांची काही नावे समोर आली असून पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान, कसबा बावड्यामध्ये प्रसूती मुलीच्या पालकांनी बोगस आधार कार्डचा वापर करून प्रसूती केल्याचा भयंकर प्रकार घडल्याचे समोर आले आहे.हा प्रकार चाईल्ड लाईन तसेच जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभागाने उघडकीस आणला. ही मुलगी सध्या 15 वर्षे 7 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी ती मुलगी साडेतेरा वर्षाची असताना तिचा विवाह झाल्याचे समोर आलं आहे. मुलीच्या आईने तिचा विवाह मंगसुळी या ठिकाणी लावून दिला होता अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे मजुरीसाठी गिरगावमध्ये आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन विवाहितेची प्रसूती झाली होती. या प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *