पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] उरुळी देवाची येथील स्क्रॅप दुकानांमध्ये असलेल्या ऑफिसचे दरवाजा कुलूप तोडून चोरट्यांनी ऑफिस मधील एलईडी टीव्ही लॅपटॉप आणि टॅब चोरी करून प्रसार झाले होते या चोरीचा शोध घेण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी गणेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे या पथकाला शोध घेण्यासाठी सूचना दिल्या त्या अनुसार तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड यांना माहिती मिळाली की उरुळी देवाची परिसरामध्ये घोरपडी करणारा इसम हांडेवाडी चौक येथे येणार आह यावर गोरे यांनी वरिष्ठांना याबद्दल माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी या इसमास सापळा रचून ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गोरे व त्यांचे पथक हांडेवाडी चौक येथे सापळा रचून थांबले त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन इसम त्या ठिकाणी आले त्यावेळी पथकातील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता 1) शिवाजी नामदेव पल्लेवाड रा. कोपरे बिल्डिंग हांडेवाडी 2) गणेश उत्तम उमाप हांडेवाडी चौक असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता त्यांनी उरळी देवाची परिसरात चोरी केल्याचे मान्य केले. त्यांच्याकडून एलईडी टीव्ही व दोन लॅपटॉप तसेच एक टॅब,होम थिएटर असा मुद्देमाल हस्तगत केला त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली असून आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग बजरंग देसाई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे,पोलीस हवालदार प्रमोद हंबीर व पोलीस हवालदार गायकवाड, बोरावके, पोलीस नाईक जाधव, नागलोत, देवीकर, पवार ,पोलीस शिपाई शिरगिरे, कुदळे, वीर आदींनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *