पुणे (हवेलीनामा शरद पुजारी सर ) यवत पोलिस स्टेशन हदीतील डाळिंब (ता. दौंड) गावात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर यवत पोलिसांनी कडक कारवाई करत तिघांना अटक केली आहे तर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

पोलिसांनी या कारवाईत एक जेसीबी,दोन ट्रक, त्यामध्ये अंदाजे १६ ब्रास माती मिश्रीत वाळु असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सत्यवान गोवर्धन पाटोळे (रा. कुंजीरवाडी ता. हवेली), गोकुळ जालिंदर शिंदे (रा. नायगाव ता. हवेली), आलम सुलेमान अन्सारी रा. डाळिंब ता. दौंड यांना ताब्यात घेतले असून जमीन मालक व वाहन मालक या सर्वांनी कट रचून या तिघांच्या यांच्या साथीने वाळू उपसा केला आहे जमीन मालक बाळासाहेब भगवान म्हस्के (रा. डाळिंब ता. दौंड)तसेच मुख्य सुत्रधार किरण सावकार म्हस्के, जे.सी.बी. मालक रविंद्र लक्ष्मण म्हस्के (रा. दोघेही डाळिंब, ता. दौंड व वाहन मालक संदीप बळीराम बारसकर रा. कुंजीरवाडी (ता. हवेली) यांनाही या कारवाईत जबाबदार धरले असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.

यवत पोलिसांना डाळींब(ता.दौड) येथे अवैध वाळू उपसा सुरु असल्याची महिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला अचानक झालेल्या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली या कारवाई मध्ये ५० ब्रास मातीमिश्रीत वाळू साठा तसेच १५ लाखांचा एक जेसीबी, १६ लाखांचे दोन ट्रक, त्यामध्ये अंदाजे १६ ब्रास माती मिश्रीत वाळु असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मातीमिश्रीत वाळू साठा मंडल अधिकारी यवत भानुदास हरिभाऊ येडे यांचे ताब्यात दिला आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार संदीप देवकर, मेघराज जगताप, रविंद्र गोसावी, दत्ता काळे व चालक विजय आवाळे यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *