पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामण काकडे यांच्या वाढदिवसानिमित तारमळा येथील डाॕ डी.वाय.पाटील हाॕस्पिटल मध्ये मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात थेऊरमधील तब्बल सातशे ते आठशे नागरिकांनी सहभाग घेतला होता

या शिबिराचे आयोजन अष्टविनायक प्रतिष्ठान थेऊर, पै. युवराजनाना काकडे युवा मंच व मित्र परिवार थेऊर, यांच्या वतीने करण्यात आले होते.शिबिरात सहभागी झालेल्या ४६५ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना मोफत गोळ्या व औषधांचेही वाटप करण्यात आले. यावेळी १०० नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले. यामध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. यावेळी शिबिरातील ८ नागरिकांना विविध शस्त्रक्रियांचे निदान करण्यात आले. तसेच पुढील महिन्यात या शस्त्रक्रिया मोफत करणार असल्याचे युवराज काकडे यांनी सांगितले.

या शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी, किडनी तपासणी, डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, स्त्रीरोग तपासणी, कान नाक घसा तपासणी, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, दातांची तपासणी, औषधे वाटप, दिव्यांग बांधवांना ओपीडी व उपयोगी वस्तू मिळणे कामी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ११० नागरिकांच्या आभा कार्डची नोंदणी केली.

या शिबिरास डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल, पिंपरी येथील नामांकित डॉक्टरांनी, येणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी केली. थेऊर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर व सर्व आशा सेविका यांनी त्यांना मदत करुन नागरीकांना मार्गदर्शन केले.

थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी सर्व डाॕक्टर नर्स तसेच आशा सेविकेचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *