पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुण्यात दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर यातील मुख्य सूत्रधार रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत असताना भोसरी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. शंकर नारायण काटे (वय- 60) आणि संगीता काटे (वय- 55) अशी हत्या झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत.तर प्रमोद मगरुडकर (वय- 47) असे हत्या करणाराचे नाव आहे त्याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली. या हत्याकांडामागच कारण समजू शकेलेले नाही. दापोडीत बेसावध असलेल्या पतीपत्नीवर टीकावाने घाव घालून दोघांची हत्या करण्यात आली आहे. काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. तेव्हा, प्रमोद त्यांच्यावर टिकावाचे घाव घातले. ही घटना शनिवारच्या रात्री दहा वाजता समोर आली आहे. प्रमोद हा हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर दिसला. हे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ येऊन त्यास ताब्यात घेतले आहे. प्रमोद हा नुकताच दिल्लीवरून आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *