पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह)  बँकेच्या लाॕकर मधील पैशाला वाळवी लागून दोन लाख रुपयांची झाली माती,राजस्थान मध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून त्यामुळे नेमका पैसा ठेवायचा तरी कुठं म्हणजे तो सुरक्षित राहिल असा प्रश्न या घटनेमुळे लोकांना पडला आहे. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले पैसे सुरक्षित राहतील याची खात्री नसणारा प्रकार राजस्थानच्या उदयपूरमधील पीएनबी बँकेतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पीएनबी बँकेच्या लॉकरमध्ये एका ग्राहकाने ठेवलेल्या नोटांना वाळवीने खाऊन टाकल्याचा प्रकार ग्राहक तरुणी लॉकर खोलायला आली तेव्हा मातीचा गोळा पाहून तिला धक्काच बसला लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख पंधरा हजार रुपये वाळवी लागून खराब झाले होते बँकेचे शाखाआधिकारी देखील तो प्रकार पाहून हदरले

उदयपूर मधील सुनीता मेहता त्यांच्या भावाचे पीएनबीच्या बँकेत लॉकर होते. दोघेही ते खोलण्यासाठी बँकेत गेले होते. गेल्या वर्षीच ते सुरु करण्यात आले पैशाची गरज भासल्यामुळे ते काढण्यासाठी गेले असता लॉकर खोलताच मातीसारखी वस्तू दिसल्याने त्या हादरल्या. बँकेच्या हलगर्जीपणामुळे तसेच योग्य नियोजन न केल्यामुळे नोटांचे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे बँक कर्मचाऱ्यांनी स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने बंडले बाहेर काढली. १५ हजाराचे ५० रुपयांचे एक बंड पूर्णपणे कुरतडले गेले होते. दुसरे बाहेरून ठीक दिसत होते५०० च्या नोटा होत्या. यामुळे बँक मॅनेजरने आम्हाला १५ हजाराच्या नोटा बदलून दिल्या. ते सर्व पैसे घेऊन आम्ही घरी गेलो तर उरलेल्या २ लाखांच्या नोटा देखील वाळवीने खाल्ल्यया  दिसल्या.

या नोटा घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही परत बँकेत गेलो. तेव्हा बँक मॅनेजरने त्या बदलून देण्यास नकार दिला. मात्र, आम्ही तिथे आरडाओरडा करताच त्याने त्या देखील बदलून दिल्या आहेत, असे मेहतांचा भाऊ म्हणाला.त्यामुळे बँकेत असणारे सर्व लाँकर चेक करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *