नाशिक [हवेलीनामा वृत्तसमुह] नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एक भरधाव कार मेंढयांच्या कळपात घुसली हा बाळू मामांच्या मेंढयांचा हा कळप होता यामध्ये 12 ते 15 मेंढयांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते. सिन्नर येथील पंचाळे गावच्या शिवारात शहा पंचाळे रस्त्याने बाळू मामाच्या मेंढयांचा कळप स्विफ्ट कारने उडवल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागातील सिन्नर परिसरात अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. बाळू मामांच्या तेरा नंबरच्या पालखीचा मुक्काम सध्या या भागात आहे. त्याच दरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे.
जवळपास अडीचशे मेंढयांच्या कळपात भरधाव स्विफ्ट कार शिरली, 10 ते 15 मेंढयांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. तर आणखी काही मेंढया गंभीर जखमी झाल्या आहेत.
बाळू मामांच्या मेंढया सध्या सिन्नर परिसरात फिरत आहे. शेजारील शेतात सायंकाळच्या वेळी जात असतांना हा अपघात घडला आहे. शहा बाजूकडून पंचाळेच्या बाजूला जात असतांना हा अपघात झाला आहे.
