पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे शहरातील कोयता गँगकडून दहशत माजविण्याचे सत्र सुरू असतानाच आता याचे लोण ग्रामीण भागात पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. पुणे अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूर भागात कोयते उगारून समाजमाध्यमात ध्वनिचित्रफीत प्रसारित करून दहशत माजविणाऱ्या तिघांविरोधात शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

प्रकरणी ओंकार उर्फ पांडा बाळासाहेब कुंभार (वय २३), दुर्वेश शिवाजी क्षेत्री (वय २३), दिलावर सुभान शेख (तिघे रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित केली होती. यात कोयते उगारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तिघे जण कोयता, तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. यावर पोलिसांच्या पथकाने त्वरित कारवाई करत ओंकार कुंभारला पकडले. त्याच्याबरोबर असलेले साथीदार दुर्वेक्ष क्षेत्री, दिलावर शेख कोयता रस्त्यावर टाकून पसार झाले. पोलिसांच्या पथकाने ओंकार उर्फ पांडा कुंभार व दुर्वांश क्षेत्री या दोघांना तलवार व कोयत्यासह ताब्यात घेतले तर दिलावर शेख पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी कोयता व तलवार जप्त केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने हे करत आहे.

“शिक्रापूर हद्दीमध्ये लोकांमध्ये भिती, दहशत पसरविणेकरीता अथवा सोशल मिडीयामध्ये लाईक व कॉमेट मिळणेकरीता कोयता तलवारीसह रिल बनवणाऱ्या तसेच वाढदिवस साजरा करताना केक कापण्यासाठी तलवार अथवा हत्यारांचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष असणार आहे”.-प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *