पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] शेत जमिनीचे रूपांतर अकृषिक जमिनीमध्ये करून उभ्या राहिलेल्या सोसायटी यांना एन ए टॅक्स बाबत दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुंबईत झालेल्या एका बैठकीत शहरी भागातील सोसायट्यांना हा कर माफ करण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेण्याचे सुतोवाच महसूल मंत्र्यांनी केले तसे झाल्यास पुण्यासह राज्यातील हजारो सोसायट्यांना दिलासा मिळणार आहे
राज्यातील शहरी भागात गृहनिर्माण संस्थांना लागू केलेली अकृषिक आकारणी रद्द करण्यासंदर्भात आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत त्यांनी याबद्दल माहिती दिली या बैठकीला आमदार मनीषा चौधरी, डॉ भारती लवेकर, गीता जैन,यामिनी जाधव, गणपत गायकवाड, अमित साटम, अतुल भातखळकर, आशिष शेलार, संजय केळकर मिहीर कोटेचा, पराग अळवणी आदी उपस्थित होते शेत जमिनीचे रूपांतर अकृषिक जमिनीमध्ये करून त्यावर उभे राहिलेले गृहप्रकल्प पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये आहेत या सोसायट्यांना दरवर्षी यासाठी कर भरावा लागतो याचा दरही अडीच ते तीन रुपये प्रति चौरस मीटर एवढा आहे परंतु अनेक सोसायटींकडून हा कर वेळेवर भरला जात नाही तर अशा स्वरूपाचा कर भरावा लागतो याची कल्पना देखील काही सोसायट्यांना नाही त्यामुळे बहुतांश सोसायट्यांचा हा कर थकला आहे काही सोसायटींकडून तर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कर थकबाकीत आहे दरवर्षी हा कर भरला नाही तर त्याच्या थकबाकीवर दरमहा दोन टक्के व्याज लागते त्यामुळे ही थकबाकी रक्कम दंडासहित 15 ते 16 लाखापर्यंत पोहोचली आहे सुमारे दोन कोटी रुपयावरून अधिक थकबाकी पुणे शहरातील सोसायटीकडे असल्याचीही माहिती पुढे येत आहे अशा सोसायट्यांना मध्यंतरी नोटीसा बजावण्यात सुरुवात झाली आहे जर ही रक्कम भरली नाही तर दंडात्मक कारवाई देखील करण्यासंदर्भात प्रशासन पावले उचलू शकते
पुणे शहरात अशा गृह निर्माण सोसायट्यांची संख्या 18 हजार तसेच आपारमेंट ची संख्या 18 हजारावर आहे त्यापैकी जुन्या असलेल्या सोसायटी यांची संख्या सुमारे पाच ते सहा हजार आहे राज्यातील गृहनिर्माण सोसायटीची संख्या एक लाख वीस हजारावर आहे तर अपार्टमेंटची संख्या सुमारे एक लाख इतकी आहे
