पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) रस्ते अपघातात मृत्पुमुखी पडलेल्या कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने शहर पोलीस दलातील पोलीस मित्र कुटुंबियांच्या मदतीला धावले पोलिस मित्र मदत निधी म्हणून एक मेसेज प्रसारीत करुन तब्बल अकरा लाख रुपयाचा निधी जमा झाला. समाज माध्यमातून मदतीला धावणार्‍या या सर्व सहकारी मित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहर पोलीसात भरोसा सेलमध्ये कर्तव्यावर असलेल्या नितिन शिंदेच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले यावर मात करण्यासाठी पुणे पोलीस दल मदतीसाठी पुढे आले. पुणे पोलीस दलातील अमलदार नितीन शिंदे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. 2007 च्या पोलीस बॅचमधील प्रत्येकाने 1 हजार रुपयांपासून 10 हजारांपर्यंत असे मिळून तब्बल 11 लाख रुपये गोळा केले आहेत. एकत्रित सर्व रक्कम कै. नितीन यांच्या मुलींच्या नावे बँकेत मुदतठेव (एफडी) केली जाणार आहे, अशी माहिती मित्रांनी दिली आहे.

पुणे पोलीस दलातील अमलदार शिंदे भरोसा सेलमध्ये कार्यरत होते. 31 जानेवारीला सोलापूरहून पुण्याला येत असताना खासगी आरामबसचा अपघात झाला. त्यामध्ये नितीनचा मृत्यू झाला यावर 2007 पोलिस बॅचमधील त्याच्या मित्राने नितीनच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचा निश्चय केला. समाज माध्यमावर एकमेकांना आवाहन करून प्रत्येकी 1 हजारांपासून 10 हजारांपर्यंत मदत गोळा करण्यात आली. अवघ्या काही दिवसांत तब्बल 11 लाखांवर रक्कम गोळा करण्यात आली आहे. नितीन आमल्या आठवणीत कायमस्वरूपी राहावा, यासाठी थोडी आर्थिंक मदत करण्याचा प्रयत्न केल्याचे मित्रांनी सांगितले. दरम्यान, नितीनने हडपसर पोलीस ठाणे, युनीट सहा या ठिकाणी काम केले होते. अ‍ॅथलेटिक्समध्ये तो उत्तम खेळाडू होता.त्यांच्या अकाली जाण्याने पोलिस दलातील मित्र परिवासह नातेवाईक मंडळीनी हळहळ व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *