पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे शहर पोलिसांकडून बेकायदा गुटका साठ्यावर कार्यवाही सुरूच असून आत्तापर्यंत लाखो रुपयाचा माल जप्त केला असून यातील मुख्य सूत्रधार मात्र अजूनही गळाला लागलेले नाहीत अवैध गुटख्याचा साठा आणि विक्री करणाऱ्या आणखी दोघांना कोंडवा पोलिसांनी अटक केली असून एन आय बी एम रस्त्यावरील पप्पू पान शॉप येथे ही कारवाई झाली त्यांच्याकडून पावणेसहा लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी जीतलाल श्रीरामनंदन यादव आणि अभिजीत शिवलिंग कटके यांना अटक करण्यात आलेली आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्री सुरू असून त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर चे पोलीस आयुक्त यांनी यावर धडक कारवाईचे आदेश दिल्याने सध्या गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धाडसत्र सुरू आहे कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी गुटका विक्री करणाऱ्या वर कार्यवाही करण्याचे आदेश दिले, येथील लोणकर नगर रस्त्यावर तंबाखूजन्य गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी पप्पू पान शॉप येथे छापा टाकून गुटका विक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून जवळपास पावने सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला या तपासा दरम्यान हा गुटखा गुड्डू खान यांच्याकडून विकत घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून कोंढवा पोलीस संशोध गुड्डू खान याचा शोध घेत आहेत.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मागच्या आठवड्यापासून शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात गुटखा विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याचे सपाटा लावला असून या परिसरात गुटखा शौकिनांना मात्र सहज गुटखा मिळणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे.या कारवाईत सातत्य राहिल्यास मात्र यावर निश्चित आळा बसू शकतो.

गुटखा बहाद्दर गुटखा करून स्वतःच्या आरोग्याकडे दूर्लक्ष तर करतातच परंतु गुटखा खाऊन रस्त्यावर घाण करून विद्रूपीकरण करण्यात मोठा त्यांचा हातखंडा आहे रस्त्याच्या कडेला सुशोभित केलेल्या भिंती रस्ता दुभाजक यावर हे गुटखाबहाद्दर सर्रास पिचकारी मारून विद्रूप करण्यात माहीर आहेत यावर कार्यवाही मात्र होत नसते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *