नाशिक [हवेलीनामा वृत्तसमुह] नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, 30 जून 2022 रोजी पहाटे त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ आढळूना आल्याची बातमी सर्वदूर पसरली. त्र्यंबकेश्वरचे हवामान आणि गर्भगृहातील तापमान पहाता बर्फ कसा तयार झाला? यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्यावर सत्यशोधन समिती गठित करून सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली.

दरम्यान चौकशी समितीत ही माहीती समोर आली असून त्यात तुंगार ट्रस्टच्या तिघांनीच पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचं समोर आले आहे. अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक आहे. लाखो भाविक या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी येतात. येथील शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगात ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या शंकराच्या पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. याचा व्हिडीओ बराच चर्चेत आला होता. मात्र हा पिंडीवर बर्फ जमा झाल्याची घटना निव्वळ बनाव असल्याचे उघड झाले आहे.

यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून देखील यावर आवाज उठवून याची चौकशीची मागणी केली होती त्यानंतर चौकशी झाल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *