नवी दिल्ली [हवेलीनामा वृत्तसमुह] भारतीय रिझर्व बँकेने रेपोदरात पुन्हा एकदा वाढ केली असून आधीच्या तुलनेत ही वाढ थोडी कमी असून झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांनी वाढवून ती आता 6.50 टक्क्यावर पोहोचला आहे यामुळे गृह वाहन आणि इतर कर्जांच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे तसेच सर्वसामान्य कर्ज घेणे अधिक माळ होणार आहे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन रेपो दरवाढीची माहिती दिली ऑगस्ट 2018 पासून रेपो दर स्थिर होता परंतु मे 2022 पासून यामध्ये सातत्याने वाढ होऊन सहा वेळा यात वाढ करण्यात आली या कालावधीत हा रेपो दर तब्बल 2.50 टक्क्याने वाढला रिझर्व बँकेने रेपो धरात वाढ केली असली तरी रिव्हर्स रेपो दराबाबत काही नमूद केले नाही त्यामुळे रिव्हर्स रेपो 3.35% इतकाच आहे

समितीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो दरवाढीच्या बाजूने मतदान केले तर दोन सदस्यांनी याच्या विरोधात मतदान केले चलनवाढीला आळा घालण्यासाठी रिझर्व बँकेने हा निर्णय घेतला जागतिक स्तरावर असेच निर्णय घेतले जात असल्याचे दिसून येत आहे अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल बँकेने ही मागच्या काही दिवसात व्याजदरात वाढ केली आहे परंतु पुढील व्याजदर वाढ कमी असेल असे संकेत दिले त्यामुळे भारतानेही मागच्या पाच वेळेच्या तुलनेत काल रेपो दरात किंचित वाढ केली गेल्या काही महिन्यात महागाई चलनवाढीचा दर कमी झाला आहे डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 5.88 टक्क्यावरून 5.72 टक्क्यावर आला
रेपो रेटचा अर्थ असा की बँका रिझर्व बँकेकडून पैसा घेते त्याचा दर हा दर वाढला म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जात वाढ होणे तर रेपो रेट कमी होणे म्हणजेच बँकेला स्वस्तात पैसा उपलब्ध होणे.
