पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग भोर वेल्हा येथील उप अभियंत्यावर सत्तर हजाराची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज सापळा रचुन लाचलुचपत स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
यावर प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, ग्रामीण पाणी पुरवठा उपलब्ध विभागात काम करणारे उप अभियंता जयंत सोपानराव ताकवले यांनी या योजने अंतर्गत खरेदी केलेल्या पाईपचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन टक्के प्रमाणे सत्तर हजार रुपये लाचेची मागणी केली होती.यावर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार दाखल केली या विभागाकडून याची पडताळणी केल्यानंतर आज ही रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्या विरुद्ध भोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम चालू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.
