नवी दिल्ली [हवेलीनामा वृत्तसमुह] ऊर्जा निर्माण क्षेत्रात भारत सातत्याने प्रगती करत असून यात देशाची ताकद वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरूमधील ‘इंडिया एनर्जी वीक’चे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी काल ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली होती. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान भारतात ऊर्जा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दरम्यान पंतप्रधान यातील अनेक कार्यक्रमांत सहभाग घेणार आहेत, विशेषतः बहुप्रतिक्षित E-20 योजना देखील सुरू करणार आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कडून अर्थव्यवस्था कार्बनमुक्त करण्यासाठी प्रतिवर्षी १०० दशलक्ष टाकाऊ मिनिरल वॉटर, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर पेट बाटल्यांचा पुनर्वापर करुन पेट्रोल पंप आणि एल पी जी एजन्सींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गणवेश तयार करणार आहे.

अनबॉटल उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी कपडे आणि गणवेश लॉन्च करणार आहेत. प्रत्येक गणवेश पुनर्वापर केलेल्या अंदाजे २८ वापरलेल्या पीईटी बाटल्यांपासून बनवला जातो. सिंगल यूज प्लॅस्टिक बंद करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, इंडियन ऑइलने रिटेल ग्राहक अटेंडंट आणि एलपीजी वितरण कर्मचार्‍यांसाठी गणवेश डिझाइन केले आहेत. ते पुनर्नवीनीकरण पॉलिस्टर आणि कापसापासून बनवले जातात. इंडियन ऑइलच्या ग्राहक-अटेंडंट गणवेशाचा प्रत्येक सेट पुनर्वापर केलेल्या अंदाजे २८ वापरलेल्या बाटल्यांपासून बनवला जातो.

किफायतशीर आणि पर्यावरणपूरक स्वयंपाकाचा पर्याय देण्यासाठी कंपनीने होम कुकिंग स्टोव्ह देखील सादर केले आहेत. हा स्टोव्ह सौर उर्जेवर तसेच सहायक उर्जा स्त्रोतांवर चालवता येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया एनर्जी वीकच्या उद्घाटन समारंभात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अनबॉटल युनिफॉर्मचे अनावरण केले. यासोबतच त्यांनी व्यावसायिक पद्धतीने स्वयंपाक करण्याची इनडोअर कुकिंग सिस्टिमही सुरू केली.

“इनडोअर सोलर कुकिंगची सुरुवात केल्याने हरित आणि स्वच्छ स्वयंपाक प्रणालीला एक नवा आयाम मिळेल. नजीकच्या काळात हा स्वयंपाकाचा स्टोव्ह तीन कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचेल”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. अनबॉटल अंतर्गत १० कोटी प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर केला जाईल, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. या कार्यक्रमात पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, आम्ही ऊर्जा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत आहोत. हायड्रोजनसह भविष्यातील इंधन आणि अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यावर आमचा भर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *