थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] ग्रामीण भागातील आर्थिक घडामोडीचे केंद्र असलेले आठवडे बाजार सध्या मोबाईल चोरांचे लक्ष असून पूर्व हवेलीतील पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर, थेऊरसह उरळीकांचन या ठिकाणी बाजारातून सध्या मोबाईल चोर सर्वसामान्यांच्या खिशावर ताव मारताना दिसून येत आहे यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर या मोठ्या लोकवस्तीच्या गावचा आठवडे बाजार दर शनिवारी भरतो येथे पंचक्रोशीतील अनेक शेतकरी आपल्या शेतातील उत्पादित माल विक्रीसाठी घेऊन येतात तसेच आजूबाजूच्या गावातील अनेक व्यापारी वेगवेगळी दुकाने थाटतात यामुळे येथे सर्वसामान्य नागरिक भाजीपाल्या बरोबरच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी गर्दी करतात अशाच गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरांनी हे आठवडे बाजार लक्ष केले असून दर बाजारी अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत तसेच थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र या गावात दर बुधवारी बाजार भरतो येथेही स्थानिक शेतकऱ्यांबरोबर आजूबाजूची व्यापारी आपली दुकाने थाटतात थेऊर सह कोलवडी, साष्टे, वाडेबोलाई, नायगाव या परिसरातून नागरिक या ठिकाणी आठवडे बाजारासाठी येतात या बाजारातून देखील नागरिकांचे मोबाईल चोरीला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत
