पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी ऑपरेशन ऑल आऊट ची अमलबजावणी करत शंभराहून अधिक कुख्यात गुन्हेगारांना गजाआड करत पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केल्याने सर्वत्र एकच चर्चा चालू आहे. या पोलीस कारवाई दरम्यान तब्बल 48 बंदुका, 89 जिवंत काडतुसे, 150 कोयते एवढा मोठा शस्त्र जप्त करण्यात आला आहे केवळ पंधरा दिवसात हा साठा हस्तगत केला आहे. हा शस्त्रसाठा बाळगणारे गुन्हेगार आपली दहशत माजवत होते.राज्याची उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांचे नेमके काय उद्योग सुरू आहेत हे सगळ्यांना दिसत आहे. हेच उद्योग हद्दपार करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मिशन ऑल आउट राबवले.

पिंपरी चिंचवड पोलीस दलातील गुंडविरोधी पथकाने ही कामगारी करत हा शस्त्रसाठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं या ऑपरेशनमध्ये पिंपरी शहरातील गुंडांच्या सात टोळ्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करून जवळपास 110 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.

अनिल तुकाराम मोहिते टोळी आणि त्यातील, 10 सदस्य, हिरा बहादुर हमाल टोळी व 07 सदस्य, शुभम सुरेश म्हस्के व इतर 17, दत्ता बाबु सुर्यवंशी व इतर 3, आकाश राजू काळे व इतर 06, विशाल विष्णू लष्करे व इतर 30, कुणाल धिरज ठाकुर व इतर 29, अक्षय मुकुंद गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *