पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे शहरातील विविध गुन्हेगारांच्या टोळ्या तसेच दहशत पसरवणार्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अलिकडेच पुण्याचे आयुक्त म्हणून रुजू झालेल्या रितेश कुमार यांनी आतापर्यंत नऊ गुन्हेगारी टोळीतील 65 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली तर अनेकांना स्थानबद्ध करण्यात आले,तसेच आपल्या सहकाऱ्यांना सूचना देताना ते म्हणाले की,मी अतिशय कडक मास्तर आहे मला काम झाल पाहिजे,मी कामच करुन घेणार असे सुनावले.
रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रित आणण्यासाठी त्यांनी आतापर्यंत 3 हजार700 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना स्थानबद्ध केले असून कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक गुन्हेगार शोधून त्यांना गजाआड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे येत्या काही काळात पुणे शहर गुन्हेगारीपासून मोकळा श्वास घेईल अशी सर्वसामान्यांना खात्री वाटत आहे.
पुणे शहराचा विस्तार होत असताना अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी पोलीस यंत्रणेवर ताण वाढला यावर पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी जोरदार पावले उचलत गुन्हेगारांवर कारवाईचा तडाखा चालू केला.
