पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, लोणी काळभोर, एम्आयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्स, स्कूल ऑफ कम्प्युटिंग आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंटतर्फे एमआयटी ग्रुप ऑफ इस्टीट्युटचे संस्थापक आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त विद्यापीठात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन तर्पण रक्तपेढी चे चैरमन श्री शशिकांत जगदाळे , एमआयटी स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड सायन्स चे डीन प्रोफेसर डॉ. सुदर्शन सानप, एम आय टी स्कूल ऑफ कम्प्युटिंग चे डीन प्रोफेसर डॉ. रामचन्द्र पुजेरी तसेच एमआयटी स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड सायन्स चे डायरेक्टर प्रोफेसर डॉ. वीरेंद्र शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शबिराला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यापीठाच्या 17 विद्याशाखेतील 250 हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी रक्तदान केले.
संयोजकांनी आयोजन यशस्वी करण्यात सहभाग दिल्याबद्दल सर्व समिती सदस्यांचे तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांचे आभार मानले. प्रोफेसर अभिजीत गळतगे यांनी आभारप्रदर्शन केले. प्रोफेसर स्वप्नील शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
