पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] (पुजारी सर) गेल्या कित्येक महिन्यांपासून पुणे शहर व परिसरात अवैधरित्या गुटख्याची साठवणूक व विक्री मोठ्या प्रमाणावर होत होती यावर अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठूनही कारवाई होताना दिसत नव्हती परंतु गेल्या दोन दिवसापासून पुणे शहर पोलिसांनी या अवैध गुटख्याविरुद्ध जोरदार मोहीम उघडली असून यामध्ये शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये जोर मोठी कारवाई करत सुमारे तीन लाख रुपयांचा गुटख गुटखा जप्त केला आहे आणि 22 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून एरवी टपरीवर सहज उपलब्ध होणारा गुटखा मात्र गेल्या दोन दिवसापासून अचानकच गायब झाल्याचे दिसून येत आहे

पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात जवळपास सर्वच पान टपरी धारक राजरोसपणे गुटका विक्री करताना दिसत होते राज्य शासनाने तंबाखूजन्य गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असताना देखील ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत होती परंतु पुणे शहर पोलिसात अलीकडेच दाखल झालेले पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कारवाईचा धडाका लावलेला आहे त्यांनी कोयता व वेगवेगळ्या गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांवर मोठी कारवाई करत आपल्या कामाची झलक दाखवली आहे यातच गेल्या दोन दिवसांपासून शहर पोलीस अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच पोलीस ठाण्याच्या परिसरात अशा प्रकारचा अवैध गुटखा विक्री करणाऱ्या मोठी कारवाई केली जात असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

गुटखा मिळत नसल्याने मात्र शौकीन पुरते अडचणीत आले आहेत त्यामुळेच गुटख्याची तहान तंबाखूवर भागविण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *